Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Ayurvedic dispensary: शेलगाव देशमुख येथील आयुर्वेदिक दवाखाना अखेर आरोग्य विभागाकडे हस्तांतरित; त्रुटी मात्र कायम!

Ayurvedic dispensary: डोणगावजवळील शेलगाव देशमुख येथे लाखो रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेला नवीन आयुर्वेदिक दवाखाना अखेर आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र या इमारतीत अद्यापही मूलभूत सोयींचा अभाव असल्याने वैद्यकीय सेवा सुरू होण्यावर प्रश्न चिन्ह आहेत.

Ayurvedic dispensary

लाखो रुपयांचा खर्च; दवाखाना वर्षानुवर्षे धुळखात, आता आरोग्य सेवा सुरू होण्याची ग्रामस्थांना अपेक्षा

डोणगाव :डोणगावजवळील शेलगाव देशमुख येथे लाखो रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेला नवीन आयुर्वेदिक दवाखाना अखेर आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र या इमारतीत अद्यापही मूलभूत सोयींचा अभाव असल्याने वैद्यकीय सेवा सुरू होण्यावर प्रश्न चिन्ह आहेत.

दवाखान्याचे बांधकाम पूर्ण होऊनही गेल्या काही महिन्यांपासून इमारत धुळखात पडली होती. हस्तांतरण न झाल्याने काही व्यक्तींनी या इमारतीत सोयाबीनच्या पोत्यांचा साठा केला होता, अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या “जनता दरबारात” हा मुद्दा उपस्थित करून दवाखाना त्वरित सुरू करण्याची मागणी केली.

यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी डोणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड यांना सदर इमारतीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. डॉ. गायकवाड यांनी पाहणी केली असता इमारतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही, तसेच वीज आणि पाणीपुरवठा देखील नाही, असे आढळून आले. त्यामुळे सद्यस्थितीत या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणे शक्य नसल्याचा अहवाल त्यांनी सादर केला.
यानंतर ग्रामपंचायतीमार्फत इमारतीतील सोयाबीनचा साठा काढून टाकण्यात आला आणि त्रुटींसह दवाखाना आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र अद्याप रस्ता, पाणी व वीजपुरवठा सुरू न झाल्याने दवाखाना कार्यान्वित झालेला नाही. ग्रामस्थ आणि शैलेश सावजी यांनी या त्रुटी दूर करून लवकरात लवकर वैद्यकीय सेवा सुरू व्हावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top