Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

various cultural-historical programs :बुलढाण्यात शिवविचारांचा जागर; विविध सांस्कृतिक-ऐतिहासिक कार्यक्रमांची रेलचेल

various cultural-historical programs : मराठी मनाचा ध्यास, स्वराज्याचा श्वास आणि राष्ट्रनिर्मितीचा आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने “शिवजन्मोत्सव २०२६” हा चार दिवसांचा भव्य, दिव्य आणि प्रेरणादायी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे मार्गदर्शक आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

cultural-historical programs

बुलढाणा : मराठी मनाचा ध्यास, स्वराज्याचा श्वास आणि राष्ट्रनिर्मितीचा आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने “शिवजन्मोत्सव २०२६” हा चार दिवसांचा भव्य, दिव्य आणि प्रेरणादायी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे मार्गदर्शक आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

शिवजयंती २०२६ च्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) स्थानिक विश्राम भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीचे अध्यक्ष गजेंद्र दांदडे, धाड नाका समितीचे अध्यक्ष मृत्युंजय गायकवाड, सचिव प्रा. सुनील सपकाळ, कोषाध्यक्ष उमेश शर्मा तसेच शिवजयंती २०२५ चे अध्यक्ष राजेंद्र काळे उपस्थित होते.

प्रारंभी राजेंद्र काळे यांनी मागील वर्षीच्या शिवजयंती उत्सवाचा आढावा घेत प्रसारमाध्यमांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यानंतर प्रा. सुनील सपकाळ यांनी यंदाच्या कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले की, सोमवार १६ फेब्रुवारी ते गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि ऐतिहासिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. १६ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध शाहिर देवानंद माळी आणि युवाशाहिर पृथ्वीराज माळी यांची “शाहीरी शिवगर्जना” सादर होणार आहे. मंगळवारी (दि. १७ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता “न समजलेले आई-बाप समजून घेताना” या विषयावर वक्ते वसंत हंकारे यांचे विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता “खाटू श्याम भजनसंध्या” आयोजित करण्यात आली आहे.

बुधवारी (दि. १८ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता शिवरायांच्या जीवनावर आधारित “मराठी पाऊल पडते पुढे” हा कार्यक्रम सादर होणार असून शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, शिवज्योती, मोटारसायकल रॅली आणि लेझर शो असे आकर्षक उपक्रमही पार पडतील.

५१ तोफांची सलामी 
गुरुवारी (दि. १९ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ वाजता शिवजन्मोत्सवाची सुरुवात होऊन ५१ तोफांची सलामी दिली जाईल. सकाळी ७ वाजता शिववंदना, शिवविहार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सोहळा होणार आहे. यासोबत गड-किल्ले, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, पोवाडा, शिवगीत आणि वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी शिवस्मारक ते ‘भारत माता’ चौकापर्यंत भव्य सांस्कृतिक शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

बहुतेक सर्व कार्यक्रम ‘शिवनेरी’ जिजामाता प्रेक्षागृह, व्यापारी क्रीडा संकुल परिसर, बुलढाणा येथे पार पडणार आहेत. लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला बुलढाणा शहर व परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवविचारांचा जागर अनुभवावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

“शिवविचारांचा उत्सव, संस्कृतीचा सोहळा” – गजेंद्र दांदडे
“तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय!” या घोषवाक्याने प्रेरित हा उत्सव केवळ जयंतीपुरता मर्यादित नसून शिवचरित्र, शिवनीती आणि शिवविचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे समितीचे अध्यक्ष गजेंद्र दांदडे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top