Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Ashok Ingle :अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक इंगळे; जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Ashok Ingle : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी अशोक इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने व प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक एस.ई.एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

Ashok Ingle

मलकापूर पांग्रा  : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी अशोक इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने व प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक एस.ई.एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

बुलढाणा दक्षिण (घाटावरील) कार्यकारिणी बैठकीस पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रतापराव मोरे व पश्चिम विदर्भ संघटक प्रल्हाद देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांनी संघटित होऊन काम करण्याची गरज अधोरेखित केली. ग्रामीण समस्यांची मांडणी करताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी समन्वय साधत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हे पत्रकारांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रतापराव मोरे यांनी ग्रामीण पत्रकार हा शासन व लोकप्रतिनिधींमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे नमूद केले. संघटन कौशल्यामुळे कामाची प्रभावी मांडणी शक्य होते आणि कार्यात दिरंगाई होता कामा नये, असा संदेश त्यांनी दिला. प्रल्हाद देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन खंडारे यांनी केले.

या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे, जिल्हा सचिव डी.एन. पांचाळ, कोषाध्यक्ष दिलीप नाईकवाड, जिल्हा सल्लागार संजय निकाळजे, चिटणीस दिपक देशमुख, संघटक अशोक खरात, सहसंघटक सुभाष नाहटा, प्रसिद्धी प्रमुख समाधान सरकटे व विधी सल्लागार सागर पनाड यांची निवड करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top