Lord Ganesha : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने सोमवार, १४ सप्टेंबर रोजी वाजत-गाजत व भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनामुळे शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

‘एक गाव, एक गणपती’ला यंदाही प्रतिसाद; २५ गावांत सामूहिक गणेशोत्सव
बोरगाव मंजू : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने सोमवार, १४ सप्टेंबर रोजी वाजत-गाजत व भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनामुळे शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
बोरगाव मंजू शहरात एकूण १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. तसेच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ७२ गावांमध्ये ७८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेत गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. यंदा ग्रामीण भागातील २५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांतर्गत सामूहिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असून, गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व मुर्तिजापूर पोलिस उपविभागीय अधिकारी वैशालीताई मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील वानखडे यांनी बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव काळात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

