Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Amravati Municipal meeting :अमरावती पालिकेच्या सभेत डीपीआर, कचरा व मोकाट श्वानांवरून खडाजंगी

Amravati Municipal meeting :महापौर–उपमहापौर निवडीनंतर पार पडलेल्या अमरावती महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले. शहर सुधार विकास आराखडा (डीपीआर), वाढती अस्वच्छता आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न यावरून सभागृहात जोरदार राजकीय धुरळा उडाला. भाजप, युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट आक्रमक भूमिकेत दिसून आले. ‘प्रशासक राज’ काळातील निर्णयांवरही अप्रत्यक्ष टीकेचे बाण सोडण्यात आले.

Amravati Municipal meeting

अमरावती : महापौर–उपमहापौर निवडीनंतर पार पडलेल्या अमरावती महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले. शहर सुधार विकास आराखडा (डीपीआर), वाढती अस्वच्छता आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न यावरून सभागृहात जोरदार राजकीय धुरळा उडाला. भाजप, युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट आक्रमक भूमिकेत दिसून आले. ‘प्रशासक राज’ काळातील निर्णयांवरही अप्रत्यक्ष टीकेचे बाण सोडण्यात आले.
युवा स्वाभिमानचे प्रशांत वानखडे यांनी शहर सुधार विकास आराखड्यातील आरक्षण बदलाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला थेट प्रश्न विचारले. शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या डीपीआरबाबत कोणता पत्रव्यवहार झाला, याची माहिती मागवण्यात आली. या प्रश्नामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे चंदू खेडकर यांनी शेगाव–रहाटगाव परिसरातील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवले. त्यानंतर भाजपच्या स्वाती कुलकर्णी आणि मिलिंद बांबल यांनी कचरा संकलन व वहनासाठी करण्यात आलेल्या करारनाम्यावर सवाल उपस्थित केले.
मुंबईच्या कोणार्क कंपनी सोबत नव्याने करण्यात आलेल्या कराराची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली; मात्र शहरातील सध्याच्या अस्वच्छतेची जबाबदारी कोण घेणार, असा थेट प्रश्न सभागृहात विचारण्यात आला. करारनाम्याची प्रत इंग्रजीत देण्यात आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘अमरावती–बडनेरा’ नामकरणास मंजुरी
महापालिकेचे नाव बदलून ‘अमरावती–बडनेरा महापालिका’ करण्याचा प्रस्ताव प्रा. वानखडे यांनी मांडला. विविध पक्षांच्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतल्यानंतर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. शहराच्या ओळखीच्या दृष्टीने हे नामकरण महत्त्वाचे असल्याची भूमिका मांडण्यात आली.

सीसीटीव्ही व मोकाट श्वानांचा मुद्दा
सभेत शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेची स्थिती आणि मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवरही चर्चा रंगली. प्रशासनाच्या नियोजनावर सदस्यांनी कठोर शब्दांत टीका केली

स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड
महत्त्वाच्या स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड करण्यात आली. विविध पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले असून आता सभापतिपद कोणत्या गटाकडे जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. महायुतीतील समीकरणांनुसार भाजप किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे सभापतिपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.एकंदरित, पहिल्याच सभेत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला आक्रमकपणे जाब विचारत राजकीय वातावरण तापवले. आगामी बैठकीत हे संघर्षाचे स्वर अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी अमरावती या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top