Mahabreaking

[breaking_news]

Mahavistar AI :कृषी विभागाकडून  अकोला तालुक्यात ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी जनजागृती

Mahavistar AI : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने महाराष्ट्र शासन कृषी विभाग विकसित महाविस्तार AI ॲपबाबत अकोला तालुक्यात जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे.मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक २२ एप्रिल बुधवारी  बोरगाव मंजू येथे सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

Mahavistar AI

 संजय तायडे                              

 बोरगाव मंजू :  तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने महाराष्ट्र शासन कृषी विभाग विकसित महाविस्तार AI ॲपबाबत अकोला तालुक्यात जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे.मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक २२ एप्रिल बुधवारी  बोरगाव मंजू येथे सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

मोहिमेअंतर्गत अकोला तालुका कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहायक कृषी अधिकाऱ्यांनी पथकाने बोरगाव मंजू येथे भेट देऊन दिवसभर शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शेतकऱ्यांना महाविस्तार AI ॲपची माहिती देत त्याचे उपयोग समजावून सांगण्यात आले.

या उपक्रमात पथकाने  शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये महाविस्तार AI ॲपडाउनलोड करून दिले. ॲपच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन, रोगनियंत्रण, हवामान अंदाज, शासकीय योजना व तांत्रिक मार्गदर्शन यांची माहिती दिली,

तालुका कृषी विभागाच्या वतीने डिजिटल कृषी सेवांचा लाभ गावपातळीवर पोहोचविण्याचे काम सुरू आहे,असून,  पुढील काळातही राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी दिली. प्रसंगी   सहायक कृषी अधिकारी संजय जाधव, अजय देशमुख,  वैशाली इंगळे यांनी यशस्वी रित्या पूर्ण केले. महाविस्तार Ai ऍप्लिकेशन चा लाभ घेण्याचे आवाहन  मंडळ कृषी अधिकारी विजय वानखेडे यांनी  केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी युवराज बेले, साहयक कृषी अधिकारी मनिषा जोशी, नागेश खराटे,विजय महाजन, परिसरातील शेतकऱ्यांन सह मंडळ कृषी अधिकारी ,उप कृषी अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top