Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Agriculture Board officer killed :टँकरच्या धडकेत कृषी मंडळ अधिकारी जागीच ठार; रिसोड–मेहकर मार्गावरील दुर्दैवी अपघात

Agriculture Board officer killed : रिसोड–मेहकर मार्गावरील सरपखेड फाट्याजवळ टँकर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात कृषी विभागातील मंडळ अधिकारी विलास बारबले (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रवीण पुन्नमवार (वय ३६) गंभीर जखमी झाले. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली.

Agriculture Board officer killed

रिसोड : रिसोड–मेहकर मार्गावरील सरपखेड फाट्याजवळ टँकर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात कृषी विभागातील मंडळ अधिकारी विलास बारबले (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रवीण पुन्नमवार (वय ३६) गंभीर जखमी झाले. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास बारबले आणि प्रवीण पुन्नमवार हे शासकीय कामानिमित्त एकलासपूर येथून रिसोडकडे दुचाकीने येत असताना सरपखेड फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा तीव्रतेमुळे विलास बारबले टँकरच्या चाकाखाली चिरडले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रवीण पुन्नमवार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळले.घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. जखमी प्रवीण पुन्नमवार यांना उपचारासाठी रिसोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, विलास बारबले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. कृषी विभागातील जबाबदार अधिकारी असलेल्या विलास बारबले यांच्या अकाली निधनामुळे विभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top