Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

remove encroachments: रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलन; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

remove encroachments: येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक मुतारीघर तसेच खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनकडे जाणाऱ्या सुमारे २० फूट रुंद रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शेख हनिफ बागवान यांनी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत सचिवालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

remove encroachments

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक मुतारीघर तसेच खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनकडे जाणाऱ्या सुमारे २० फूट रुंद रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शेख हनिफ बागवान यांनी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत सचिवालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत, एका महिन्याच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांना नींबू शरबत देऊन उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली.बसस्थानक परिसरात असलेल्या सार्वजनिक मुतारीघर व गोडाऊनकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. हा रस्ता तात्काळ खुला करावा, यासाठी वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने अखेर शेख हनिफ बागवान यांनी प्रजासत्ताक दिनी सकाळी ध्वजारोहणानंतर ग्रामसचिवालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली होती.

या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्त्याशी चर्चा करून अतिक्रमण हटविण्याबाबत ठोस आश्वासन दिले. तसेच ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करून एका महिन्याच्या आत रस्ता अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिले.

यावेळी गुलशेर खासाब, माजी उपसरपंच भगवान साळवे, माजी ग्रामपंचायत सदस्य अजहरखा पठाण, भगवान गावंडे, ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे, अर्जुन मगर, मुबारक पठाण, ग्रामपंचायत सदस्य नामदेव उगले, माजी सरपंच बंडू उगले, मन्नान कुरेशी, गोपी टाले, शरद आटोळे, अंबादास टाले, बीट जमादार निवृत्ती पोफळे, मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे, तलाठी प्रभाकर बाविस्कर, पत्रकार पवन मगर, डॉ. गंगाराम उबाळे, फकीरा पठाण यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपोषण मंडपात उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top