Mahabreaking

[breaking_news]

MLA Manoj Kayande :“वडिलांनंतर खंबीर आधार देणारा देव हरपला…” – दादांच्या निधनाने आमदार मनोज कायंदे भावूक

MLA Manoj Kayande :उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत. “ही बातमी समजताच विश्वासच बसत नव्हता. मनात सतत घालमेल सुरू होती; पण नियतीने जे मान्य केले ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

MLA Manoj Kayande

देऊळगाव राजा : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत. “ही बातमी समजताच विश्वासच बसत नव्हता. मनात सतत घालमेल सुरू होती; पण नियतीने जे मान्य केले ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

MLA Manoj Kayande

आमदार मनोज कायंदे म्हणाले की, अवघ्या एक ते दीड वर्षांपूर्वी वडील स्व. देवानंदजी कायंदे यांचे निधन झाले. त्या घटनेनंतर राजकारणासह आयुष्यातील अनेक क्षेत्रांत आपण पोरके झालो असल्याची भावना मनात होती. त्याच काळात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. “दादांच्या तोंडी नेहमी एकच वाक्य असायचे – युवकांना संधी द्या. त्या विश्वासातूनच त्यांनी मला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. तो क्षण आजही आठवला की वडिलांची आठवण डोळ्यांसमोर उभी राहते,” असे त्यांनी सांगितले.

MLA Manoj Kayande

दादांचे आशीर्वाद आणि मतदारसंघातील जनतेच्या विश्वासामुळे नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर अजितदादा पवार हे वडिलांप्रमाणेच प्रत्येक लहानमोठ्या बाबींचा आढावा घेत असत, असे कायंदे म्हणाले. “विकासाचा चढता आलेख कसा ठेवायचा, कामात सातत्य कसे राखायचे, यश कसे मिळवायचे—याचे बाळकडू जणू दादांकडूनच मिळाले. कामात सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल हे त्यांचे शब्द क्षणोक्षणी आठवत राहतात,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

इतकेच नव्हे, तर “विरोधकांकडूनही शिकण्यासारखे बरेच काही असते; त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका,” असा मोलाचा सल्ला दादांनी दिला होता, तो आजही कानात घुमत असल्याचे त्यांनी सांगितले.

दादांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर सिंदखेडराजा मतदारसंघाचाही अपूरणीय तोटा झाल्याचे नमूद करत आमदार मनोज कायंदे म्हणाले, “वडिलांनंतर मला खंबीर आधार देणारा देवच हरपला आहे.” अशा शब्दांत त्यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top