illegal gutkha sale : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून २७ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पातूर ते अकोला हायवेवरील सर्व्हिस रोडवर १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र द्वारकादास सोळंके (वय ३६, रा. आकाशवाणी रोड, सिव्हील लाईन, अकोला) यांच्या तक्रारीवरून ही कार्यवाही करण्यात आली आहे.

संजय गोतरकर
पातूर : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून २७ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पातूर ते अकोला हायवेवरील सर्व्हिस रोडवर १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र द्वारकादास सोळंके (वय ३६, रा. आकाशवाणी रोड, सिव्हील लाईन, अकोला) यांच्या तक्रारीवरून ही कार्यवाही करण्यात आली आहे.
आरोपी यासीन खान गुलाब खान (वय २९, रा. रामजी नगर, बोरगाव मंजू, ता. जि. अकोला) हा प्रतिबंधित गुटख्यासह मिळून आल्याने पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला पाचारण केले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. सोळंके यांनी पंचनामा करून आरोपीकडून विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालात बीएचआर सुगंधित तंबाखू, झेडएल जाफरानी जर्दा, गोवा गुटखा, बाहुबली पान मसाला, ब्लू व डब्ल्यू चेविंग टोबॅको, व्ही-०१ सुगंधित तंबाखू आदींचा समावेश असून एकूण किंमत २७,३२४ रुपये आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३६१/२०२५ अन्वये अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), २७(३)(e) सह कलम ३(i)(zz) व कलम ३०(२)(a) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५ व १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून १६ डिसेंबर रोजी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सदर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस अधिकारी वसीम उद्दीन यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम करीत आहेत.
नागरिकांचा सवाल – प्रहार मोहिमेंतर्गत कारवाई कधी?
पातूर शहरात मागील काही दिवसांपासून अवैध गुटखाविक्रीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. मात्र यापूर्वी कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व अफवा पसरल्या होत्या. शहर व परिसरात खुलेआम अवैध गुटखाविक्री सुरू असून, याकडे पोलिसांनी सातत्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ‘प्रहार’ मोहिमेंतर्गत पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

