‘Abhijat Marathi Language Day’: कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अलका जाधव (बुलढाणा) उपस्थित होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून सुरेश साबळे, साहित्यिक तसेच माजी गुणवंत कामगार (बुलढाणा) उपस्थित होते.

बुलढाणा : कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अलका जाधव (बुलढाणा) उपस्थित होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून सुरेश साबळे, साहित्यिक तसेच माजी गुणवंत कामगार (बुलढाणा) उपस्थित होते.
कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे स्वागत केंद्र संचालक नंदकिशोर खत्री यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी मराठी कलापथकातील कलावंतांनी मराठी भाषेच्या सन्मानार्थ कलासादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आपल्या मनोगतात प्रमुख वक्ते सुरेशजी साबळे यांनी सांगितले की, “मराठी ही व्यापक आणि समृद्ध भाषा असून ती प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. तिचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. पुढील पिढीला मराठीचे महत्त्व समजावून देणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व्हि. के. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पी. आर. उंबरहंडे, तसेच महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलढाणा येथील विद्यार्थी मुकेश मते, स्वप्निल बाठे, देवानंद मोरे, प्रणाली निकाळजे आणि संतोष तायडे यांनी परिश्रम घेतले.

