A woman was robbed : शहरातील विवेकानंद नगर येथील एका महिलेच्या घरात दोन आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून रोख रक्कम व दागिने लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी दि. १३ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील विवेकानंद नगर येथील एका महिलेच्या घरात दोन आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून रोख रक्कम व दागिने लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी दि. १३ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेकानंद नगर येथील रहिवासी महिला रंजना अनिल घायाळ (वय ४३) या दि. १२ रोजी दुपारी आपल्या घरी असताना आरोपी सलमा बेगम आयान खान व आयान खान (दोघेही रा. जालना) यांनी मालमत्ता चोरण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. यावेळी आरोपींनी फिर्यादींच्या सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करून लोटपाठ केली. त्यानंतर घरातील लोखंडी विळीचा धाक दाखवून कपाटातील नगदी ३७ हजार रुपये तसेच वापरातील सोन्याचे दागिने (किंमत सुमारे १५ हजार रुपये) असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे करीत आहेत.

