Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

A tipper truck collided with an ST bus : टिप्परची एसटी बसला धडक; वाहकासह तिघेजण जखमी

A tipper truck collided with an ST bus : पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम महामार्गावर ग्राम बोडखा येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी   टिप्पर व एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसच्या वाहकासह दोन महिला प्रवासी असे तिघेजण जखमी झाले असून बसचे मोठे नुकसान झाले आहे.

A tipper truck

पातूर–मालेगाव मार्गावरील ग्राम बोडखा  येथील  घटना

पातूर : पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम महामार्गावर ग्राम बोडखा येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी   टिप्पर व एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसच्या वाहकासह दोन महिला प्रवासी असे तिघेजण जखमी झाले असून बसचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलीस सूत्रांनुसार, टिप्पर क्र. MH 30-BD-2682 च्या चालकाने इंडिकेटर न देता व कोणताही इशारा न देता निष्काळजीपणे युटर्न घेतला. यावेळी पातूरहून मालेगावकडे जाणारी एसटी बस क्र. MH 13 CU 7135 टिप्परला जाऊन धडकली.

या धडकेत बसमधील डाव्या बाजूच्या सीटवर बसलेले वाहक मुजाजी खंडोजी काळे यांच्या उजव्या पायाला मुक्का मार लागला. तसेच बसमधील दोन महिला प्रवासी यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे बसच्या समोरील काचा, डाव्या बाजूचे केबिन, केबिन गेट, प्रवासी गेट, बोनेट, बफर तसेच केबिनमधील काचा तुटून मोठे नुकसान झाले आहे.या प्रकरणी एसटी चालक काझी अजमत उल्ला काझी बरकत उल्ला (वय ४५, रा. काझीपुरा, मंगळूरपीर, जि. वाशिम) यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालकाविरुद्ध अप. नं. 360/25 अन्वये कलम 281, 125(a), 324(5) BNS सह कलम 184 मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेका गजानन मानकर करीत आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top