A tipper truck collided with an ST bus : पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम महामार्गावर ग्राम बोडखा येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी टिप्पर व एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसच्या वाहकासह दोन महिला प्रवासी असे तिघेजण जखमी झाले असून बसचे मोठे नुकसान झाले आहे.

पातूर–मालेगाव मार्गावरील ग्राम बोडखा येथील घटना
पातूर : पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम महामार्गावर ग्राम बोडखा येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी टिप्पर व एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसच्या वाहकासह दोन महिला प्रवासी असे तिघेजण जखमी झाले असून बसचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, टिप्पर क्र. MH 30-BD-2682 च्या चालकाने इंडिकेटर न देता व कोणताही इशारा न देता निष्काळजीपणे युटर्न घेतला. यावेळी पातूरहून मालेगावकडे जाणारी एसटी बस क्र. MH 13 CU 7135 टिप्परला जाऊन धडकली.
या धडकेत बसमधील डाव्या बाजूच्या सीटवर बसलेले वाहक मुजाजी खंडोजी काळे यांच्या उजव्या पायाला मुक्का मार लागला. तसेच बसमधील दोन महिला प्रवासी यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे बसच्या समोरील काचा, डाव्या बाजूचे केबिन, केबिन गेट, प्रवासी गेट, बोनेट, बफर तसेच केबिनमधील काचा तुटून मोठे नुकसान झाले आहे.या प्रकरणी एसटी चालक काझी अजमत उल्ला काझी बरकत उल्ला (वय ४५, रा. काझीपुरा, मंगळूरपीर, जि. वाशिम) यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालकाविरुद्ध अप. नं. 360/25 अन्वये कलम 281, 125(a), 324(5) BNS सह कलम 184 मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेका गजानन मानकर करीत आहेत.

