Mahabreaking

[breaking_news]

Siddhachaitanya Shivacharya Maharaj  :  संस्कारांची शिदोरी जीवनाला आधार देते! सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन

Siddhachaitanya Shivacharya Maharaj  : प्रत्येकाच्या जीवनात संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बालपणात आई-वडिलांकडून मिळणारे संस्कार व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबतच समाजात वावरताना योग्य दिशा देतात. संस्कारांची शिदोरी सोबत असेल, तर जीवनाला आधार मिळतो, असे प्रतिपादन मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले. साखरखेर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त एकता नवदुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनात ते बोलत होते.

Shivacharya Maharaj

  वीरमातांच्या त्यागातून प्रेरणा घ्या, महिलांचा सन्मान करा! साखरखेर्ड्यात महाराजांचे प्रबोधन

साखरखेर्डा : प्रत्येकाच्या जीवनात संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बालपणात आई-वडिलांकडून मिळणारे संस्कार व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबतच समाजात वावरताना योग्य दिशा देतात. संस्कारांची शिदोरी सोबत असेल, तर जीवनाला आधार मिळतो, असे प्रतिपादन मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले. साखरखेर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त एकता नवदुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनात ते बोलत होते.

dr date add

वीरमातांच्या त्यागातून प्रेरणा घ्या; महिलांचा सन्मान करा!

देशाच्या इतिहासात अनेक शूरवीर महिलांनी आपल्या प्राणांची बाजी लावून पराक्रम गाजविला आहे. अनेक वीरमातांनी आपल्या शूर पुत्रांना देशासाठी समर्पित केले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि शिवा काशीद यांच्या मातेसारख्या अनेक मातांनी इतिहास घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या त्यागातून आणि संस्कारांतून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे महाराजांनी सांगितले.

नवरात्रोत्सवात देवीची उपासना करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकाच महिलांचा सन्मान करणेही आवश्यक आहे. महिलांचा आदर, त्यांना योग्य स्थान आणि सन्मान देणे हीच खरी संस्कृती असल्याचे विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

स्पर्धांतील विजेत्या महिला व युवतींचा गौरव

एकता नवदुर्गा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त संगीत खुर्ची आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्या महिला व युवतींना सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिवदास ढोलेकर यांनी शिवा काशीद यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी कशा प्रकारे घडविले, याविषयी ऐतिहासिक माहिती विशद केली. यावेळी कैलास ढोलेकर आणि अंजली ढोलेकर यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या आरतीमध्ये ऋतीक बोबडे यांनी सहभाग घेतला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील रिंढे, डॉ. भागवत सुरुशे, कोंडूबा जाधव, शिवाजी जाधव, संतोष बोबडे, रामकृष्ण मिस्त्री, श्रीकांत पऱ्हाड, नरेंद्र सुरळकर, बबलू पवार, पवन जाधव, सुधाकर पऱ्हाड, रविंद्र पऱ्हाड, ओम जाधव, हर्षल धुळे, देवांश जैस्वाल, तेजस पंचाळ, अनंता बोंडफळे, प्रेम पऱ्हाड यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top