Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

killing two women :भरधाव बसची मजुरांच्या मालवाहुला धडक, दोन महिला जागीच ठार

killing two women :भरधाव बसने मजून घेऊन जात असलेल्या मालवाहू वाहनाला मागून धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार तर पाच गंभीर जखमी झाल्या. ही घटना देऊळगाव राजा येथे 11 डिसेंबर रोजी सकाळी घडली. मजुरीसाठी मालवाहु वाहनात चढत असतानाच बसने जोरदार धडक दिली.

killing two women

पाच महिला मजूर गंभीर जखमी; मजुरीसाठी आलेल्या महिलांवर काळाचा घाला, समाजमन हेलावले

 गजानन तिडके

देऊळगाव राजा : भरधाव बसने मजून घेऊन जात असलेल्या मालवाहू वाहनाला मागून धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार तर पाच गंभीर जखमी झाल्या. ही घटना देऊळगाव राजा येथे 11 डिसेंबर रोजी सकाळी घडली. मजुरीसाठी मालवाहु वाहनात चढत असतानाच बसने जोरदार धडक दिली. परराज्यातून मजुरीच्या शोधात आलेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याने समाजमन हेलावले. जखमी महिलांना प्राथमिक उपचारांनंतर जालना येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्या सर्वांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मायाबाई सुरज काजले (वय 32), मुक्काम – रामखेरा, ता. खगनार, जि. बुरहानपूर, रिचाय काल्या कासदेकर (वय 72), मुक्काम – नांदुरी, ता. धारणी, जि. अमरावती असे मृतक महिलांची नावे आहेत.

 देऊळगाव राजा येथील कापूस जिनिंगमध्ये परराज्यासह अमरावती जिल्ह्यातून आलेल्या अनेक महिला मजुरांचे वास्तव्य आहे. रोजीरोटीच्या शोधात आलेल्या या महिला आज (११ डिसें.) सकाळी साडेसातच्या सुमारास कापूस वेचण्यासाठी पिंपळगाव येथे जाण्यासाठी मालवाहू पिकअप (MH 38 E 2082) मध्ये चढत होत्या. याच दरम्यान जाफराबाद-जालना मार्गावरून जाणाऱ्या एसटी बस क्रमांक (MH 20 BL 2276)  ने पिकअपला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला.  धडकेची तीव्रता एवढी होती की दोन्ही मृतदेहांचा अक्षरशः चुराडा झाला होता, अशी माहिती डॉक्टर अक्षय गुठे, चालक सुभाष कणखर आणि समाधान आघाव यांनी दिली.या अपघातात सुहाना प्रतिराम इपने (वय 16), रा. नांदुरी, ता. धारणी, खुशबू बबलू पालवी (वय 17), रा. तागमला, ता. खगनार, जि. बुरहानपूर, सुलोचना हारासिंग सहारे (वय 35), रा. भगवानपुरा, ता. नांदोरी, जि. धारणी, रोशनी मंगल इपने  (वय 22), रा. भगवानपुरा, ता. नांदुरी, ता. धारणी, नर्मदा सोनू इपने (वय 45), रा. नांदुरी, ता. धारणी, जि. अमरावती आदी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमी महिलांना प्रथम देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जालना येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

 अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपासात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी दिली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top