Mahabreaking

[breaking_news]

A silent rally :विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला बुलढाण्यात मूक रॅली

A silent rally : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांप्रती ऐक्य व्यक्त करण्यासाठी ‘संवेदनशील बुलढाणेकर’ या मंचाच्या वतीने गुरुवार, २३ जुलै रोजी बुलढाण्यात मूक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत नागरिकांनी पक्ष, संघटना, जात आणि धर्माचे भेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

A silent rally

‘संवेदनशील बुलढाणेकर’ रस्त्यावर; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

बुलढाणा : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांप्रती ऐक्य व्यक्त करण्यासाठी ‘संवेदनशील बुलढाणेकर’ या मंचाच्या वतीने गुरुवार, २३ जुलै रोजी बुलढाण्यात मूक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत नागरिकांनी पक्ष, संघटना, जात आणि धर्माचे भेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी शहरातील प्रगती वाचनालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. बैठकीस विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
बैठकीत उपस्थितांनी परीक्षा प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असून, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा प्रश्न हा कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक चौकटीत न पाहता देशाच्या भविष्यासंदर्भातील विषय म्हणून हाताळला जावा, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.
बैठकीत सर्वानुमते २३ जुलै रोजी मूक रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी १२ वाजता शहरातील हुतात्मा स्मारक येथून रॅलीला प्रारंभ होईल. प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. या मूक रॅलीमध्ये इयत्ता १० वी, ११ वी, १२ वीचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, पालक तसेच सामाजिक भान असलेल्या सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top