Mahabreaking

[breaking_news]

A series of social initiatives :उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची मालिकाच; शिवसेनेचे कार्यकर्त्यांना आवाहन

A series of social initiatives : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबविण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि गजानन वाघ यांनी संयुक्तपणे केले आहे.

A series of social initiatives

 रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदानातून वाढदिवस साजरा करा; जालिंदर बुधवत यांचे आवाहन

बुलढाणा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबविण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि गजानन वाघ यांनी संयुक्तपणे केले आहे.

A series of social initiatives

दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्त रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रुग्णांना फळवाटप, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गरजूंना अन्नदान, वृक्षारोपण आणि मोफत वृक्षवाटप असे विविध कार्यक्रम जिल्हाभर आयोजित करण्यात येणार आहेत.

add

बुलढाण्यातील कार्यक्रमांचे वेळापत्रक

कार्यक्रमांची सुरुवात २४ जुलै रोजी बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपण व शेतकऱ्यांना मोफत वृक्षवाटप याने होणार आहे. याच दिवशी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला आहे.

तसेच २६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता बुलढाणा येथील जगदंबा देवी मंदिरात महाआरती होईल. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, तसेच मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. यानंतर गर्दे सभागृह, बुलढाणा येथे रक्तदान शिबिर, कार्यकर्ता मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दिवसाची सांगता पळसखेड येथील सेवा संकल्प आश्रमात अनाथ व निराधार बांधवांसाठी स्नेहभोजन देऊन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी या सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top