commits suicide : येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरातील एका मोटारसायकल मॅकनिक म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय युवकाने लिंबाच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या केली. ही घटना २४ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली. शाम जयराम अवचार असे मृतक युवकाचे नाव आहे.

साखरखेर्डा : येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरातील एका मोटारसायकल मॅकनिक म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय युवकाने लिंबाच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या केली. ही घटना २४ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली. शाम जयराम अवचार असे मृतक युवकाचे नाव आहे.
साखरखेर्डा येथील शाम जयराम अवचार हा मोटारसायकल मॅकनिक म्हणून काम करीत होता. हातात कौशल्य असल्याने अनेक ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले होते . व्यवसायही जोमात होता . परंतू आज दुपारी अचानक तो माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल यांच्या शेतातील क्रिकेट खेळत असलेल्या जागेवर गेला. तेथील एक दोर घेऊन लिंबाच्या झाडाला बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साखरखेर्डा ते लव्हाळा रोडवरुन जाणाऱ्या व्यक्तिंनी पाहिली . त्याला खाली सोडून पाहिले असता त्यांची प्राणज्योत मालवली होती. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पीएसआय गणेश डोईफोडे , बिट जमादार बाजीराव खरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी विजय हरिभाऊ जैवळ यांच्या तक्रारीवरून अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे.

