Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

married woman was brutally beaten :कौटुंबिक वादातून पती-सासऱ्यांकडून विवाहितेला अमानुष मारहाण 

married woman was brutally beaten : देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहा येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला पती व सासऱ्याने लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण करून स्कुटीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A married woman
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहा येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला पती व सासऱ्याने लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण करून स्कुटीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी पूजा आकाश सरोदे (वय २६, रा. सिनगाव जहा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीने सांगितले की, तिचा पती आकाश रावसाहेब सरोदे यांच्या मोबाइलमध्ये एका अनोळखी महिलेसोबत व्हॉट्सॲप चॅटिंग आढळून आली. याबाबत तिने सासरे रावसाहेब हिंमत सरोदे यांना माहिती दिली. मात्र समजूत काढण्याऐवजी दोन्ही आरोपींनी फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करत घराजवळील लोखंडी रॉड व लाकडी काठीने डाव्या पायावर व पोटरीवर मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक २ (सासरे) यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे तर आरोपींनी फिर्यादीची स्कुटी दगडाने फोडून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाणीनंतर दोघांनीही “जिवे मारून टाकू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. या घटनेची तक्रार २० जानेवारी २०२६ रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 118(1), 115, 352, 351(2), 351(3), 324(4) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोहेका माधव कुटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top