A grand healthcare : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक उद्देशाने आज, रविवार २२ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळापूर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचार मार्गदर्शन मिळणार आहे.

गरजू रुग्णांसाठी अलवाफी फाउंडेशनचा पुढाकार; अकोल्यातील नामांकित डॉक्टर बाळापुरात देणार मोफत सेवा
ज़ाकिर अहमद शेख
बाळापूर : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक उद्देशाने आज, रविवार २२ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळापूर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचार मार्गदर्शन मिळणार आहे.
खामगाव रोडवरील म्हैस नदी पुलाजवळ असलेल्या हजरत काले शाह मियां दरगाह मैदानावर हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अकोला येथील विविध नामांकित रुग्णालयांशी संलग्न अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात सहभागी होऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत.
सहा तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
या आरोग्य शिबिरात विविध वैद्यकीय क्षेत्रांतील सहा डॉक्टर सेवा देणार आहेत. यामध्ये डॉ. राकेश बजाज (एमबीबीएस, एमएस), जनरल सर्जन, मंज्योत हॉस्पिटल, अकोला; डॉ. मेहविश खान राजा (एमबीबीएस, डीजीओ, एमएस), स्त्रीरोगतज्ज्ञ, सनशाइन हॉस्पिटल, अकोला; डॉ. फैजान अहमद अंसारी (एमबीबीएस, एमडी मेडिसिन, डीएम नेफ्रोलॉजी), मूत्रपिंड विकारतज्ज्ञ, अंसारी हॉस्पिटल, अकोला; डॉ. नवनीत अग्रवाल (एमबीबीएस, एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजी, डीएम मेडिकल ऑन्कोलॉजी); डॉ. फरहाना अंसारी (एमबीबीएस, एमडी, डीव्हीएल), त्वचारोगतज्ज्ञ, ट्रायकोलॉजिस्ट व कॉस्मेटोलॉजिस्ट, अंसारी हॉस्पिटल, अकोला तसेच डॉ. मोहम्मद शोएब अजीब बंस, एलएलबी, अल हयात क्लिनिक अँड हिजामा सेंटर, बाळापूर यांचा समावेश आहे.
गरजू रुग्णांसाठी आरोग्यसेवेचा सामाजिक उपक्रम
अलवाफी चॅरिटी फाउंडेशन आणि जमीयतुल कुरैश, बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अलवाफी चॅरिटी फाउंडेशनचे चेअरमन हाजी शेख वजीर कुरैशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणी व उपचारविषयक मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देणे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे.
बाळापूर शहरासह तालुक्यातील आणि परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

