Mahabreaking

[breaking_news]

Devanandbhau Kayande: स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भक्तीचा महासंगम; उद्या भव्य कावड यात्रा

Devanandbhau Kayande: श्रद्धा, भक्ती आणि स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्याच्या भावनेतून सोमवारी, दि. ३१ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे यांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ७ वाजता राम मंदिर, टाकरखेड भागिले येथून या भक्तिमय यात्रेला प्रारंभ होणार असून, परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दीपक अशोकराव चेके पाटील यांनी केले आहे.

Kayande

 ‘बम बम भोले’च्या जयघोषात श्रद्धेची कावड यात्रा; धोत्रा नंदईच्या हेमाडपंती महादेव मंदिरात होणार समारोप

गजानन तिडके

देऊळगाव राजा : श्रद्धा, भक्ती आणि स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्याच्या भावनेतून सोमवारी, दि. ३१ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे यांची उपस्थिती राहणार आहे.सकाळी ७ वाजता राम मंदिर, टाकरखेड भागिले येथून या भक्तिमय यात्रेला प्रारंभ होणार असून, परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दीपक अशोकराव चेके पाटील यांनी केले आहे.

Kayande

स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही कावड यात्रा श्रद्धा आणि भावनेचा एक अनोखा संगम ठरणार आहे. कावडधारी भाविकांच्या मुखातून उमटणारा ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष संपूर्ण परिसर भक्तिमय करणार आहे.

ही यात्रा राम मंदिर, टाकरखेड भागिले येथून प्रारंभ होऊन देऊळगाव मही, सरंबा फाटा आणि धोत्रा नंदई फाटा मार्गे मार्गक्रमण करणार आहे. यात्रेचा समारोप ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या हेमाडपंती महादेव मंदिर, धोत्रा नंदई येथे होणार आहे.

स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या स्मृतींना धार्मिक श्रद्धेतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित या यात्रेत भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी मा. मनोजभाऊ कायंदे मित्र मंडळाने पुढाकार घेतला असून, परिसरात यात्रेची उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रसंगी मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ नंदाताई देवानंद कायंदे  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दीपक अशोकराव चेके पाटील  यांनी या कावड यात्रेचे आयोजन केले आहे. स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या स्मृतींना भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेच्या माध्यमातून अभिवादन करणारी ही कावड यात्रा परिसरातील शिवभक्तांसाठी एक संस्मरणीय धार्मिक सोहळा ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top