introduction meet : विवाह जुळविताना वधू-वरांच्या कुटुंबांना येणारा आर्थिक व मानसिक ताण कमी व्हावा, तसेच समाजातील विवाहेच्छुक मुला-मुलींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट, बुद्धभूमी शिर्ला यांच्या वतीने रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य बौद्ध वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुद्धभूमी, शिर्ला (ता. पातूर, जि. अकोला) येथे दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.

विवाह जुळविण्याचा खर्च वाचणार; बुद्धभूमी शिर्ला येथे बौद्ध समाजाचा अनोखा सामाजिक उपक्रम
पातूर : विवाह जुळविताना वधू-वरांच्या कुटुंबांना येणारा आर्थिक व मानसिक ताण कमी व्हावा, तसेच समाजातील विवाहेच्छुक मुला-मुलींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट, बुद्धभूमी शिर्ला यांच्या वतीने रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य बौद्ध वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुद्धभूमी, शिर्ला (ता. पातूर, जि. अकोला) येथे दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.
यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे. अशा आर्थिक परिस्थितीत मुला-मुलींचे विवाह जुळविताना मोठा खर्च करावा लागत असल्याने अनेक पालकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन विवाह जुळविण्याच्या प्रक्रियेतील अनावश्यक खर्चाला आळा बसावा आणि समाजातील विवाहेच्छुक कुटुंबांना एकाच व्यासपीठावर परस्परांशी संवाद साधता यावा, या हेतूने संस्थेने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
या मेळाव्यात विवाहेच्छुक मुला-मुलींच्या पालकांना एकमेकांशी परिचय करून घेण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक पालकांनी आपल्या मुला-मुलींचा सविस्तर परिचयपत्र (बायोडाटा) सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच परिचयपत्रांची संकलित माहिती पुस्तिका तयार करण्यात येणार असल्याने बायोडाटाची एक छायांकित प्रत आणि मुला-मुलींचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
याशिवाय इच्छुक पालकांनी आपले बायोडाटा दि. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत आयोजक मंडळाकडे दिलेल्या संपर्क क्रमांकांवर पाठवावेत, जेणेकरून मेळाव्यात सहभागी होणाऱ्या पालकांसाठी आवश्यक नियोजन व व्यवस्था करणे सोयीचे होईल. सहभागी होणाऱ्या पालकांनी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ११ वाजता बुद्धभूमी शिर्ला येथे उपस्थित राहावे, असेही कळविण्यात आले आहे.
अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा
मेळाव्याची सुरुवात दुपारी १२ ते १२.३० या वेळेत बुद्धवंदनेने होईल. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत धम्मदेसना होणार आहे. दुपारी १ ते ४.३० या वेळेत वधू-वर पालक परिचयाचा मुख्य कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर ४.३० ते ४.४० या वेळेत आगामी कार्यक्रमासंदर्भात सूचना व मार्गदर्शन करण्यात येईल. सायंकाळी ४.४० ते ५ या वेळेत कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण वधू-वर पालक परिचय मेळावा पूर्णतः निःशुल्क असून, सहभागी होणाऱ्या कोणत्याही पालकांकडून प्रवेश शुल्क किंवा इतर कोणतीही फी आकारली जाणार नाही.
या सामाजिक उपक्रमाचा जास्तीत जास्त विवाहेच्छुक मुला-मुलींच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट, बुद्धभूमी शिर्ला यांच्या विश्वस्त व आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
- डी. एस. ननीर – ९०११९२८२७२
- पी. जे. वानखडे – ९६२३२८४५६२
- एस. पी. सरदार – ९८५०२६३८८१
- बी. डी. वानखडे – ९६०४९७७१०३
- एस. के. सिरसाट – ९६६५१४४८२३
- के. पी. वानखडे – ९८२२५३८२०९
- बी. एच. खंडारे – ९७६३३४४२५७
- जी. के. खंडारे – ९५६१६७१८०४
- एस. डी. डोंगरे – ९१४६९१९४७५

