Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

A gang of women :बसप्रवासात महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

A gang of women : बसप्रवासादरम्यान सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चार महिला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.

A gang of women

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई,दोन लाखांचे दागिने केले होते लंपास

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : बसप्रवासादरम्यान सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चार महिला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) व श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

फेमिना बी. नूर मोहम्मद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान बसमध्ये प्रवास करत असताना चार अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीतील सोन्याचे दागिने असलेले पाकीट चोरी केले. या पाकिटात सुमारे १९० मणी असलेली पोत, तीन पोती तसेच १७ नग पुतळ्या असून एकूण किंमत अंदाजे दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी देऊळगाव राजा येथून नंदिनी सुरी गड्डी (वय २२), पार्वती राकेश गड्डी (वय २०), कस्तुरी राम गड्डी (वय २०, सर्व रा. पाण्याच्या टाकीजवळ, सोलापूर) तसेच लक्ष्मी व्यंकटेश मच्छा (वय २५, रा. पाण्याच्या टाकीजवळ, माजलगाव) या चार महिला आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादीने आरोपींची ओळख पटविल्यानंतर त्यांचे वैद्यकीय परीक्षण करून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिंड यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, महिला हेड कॉन्स्टेबल वनिता शिंगणे व पोलीस कॉन्स्टेबल मनोज खरडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.दरम्यान, प्रवाशांनी बसप्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.घटना स्थळी ठाणेदार ब्रह्मा गिरी यांनी भेट दिली होती.पुढील तपास उपनिरीक्षक मिंड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top