Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

A fight broke out :देऊळगाव मही येथे दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी तक्रारीवरून  २० ते २१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

  1. A fight broke out : देऊळगाव मही येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना दि. ११ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ ते ९ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, मारहाण, विनयभंग, गैरवर्तन, पैसे व दागिने जबरदस्तीने नेल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार दि. १२ जानेवारी रोजी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

A fight broke

मारहाण, विनयभंग, रोख रक्कम व दागिने लंपास केल्याचे गंभीर आरोप

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : देऊळगाव मही येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना दि. ११ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ ते ९ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, मारहाण, विनयभंग, गैरवर्तन, पैसे व दागिने जबरदस्तीने नेल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार दि. १२ जानेवारी रोजी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी रविंद्र दादाराव मुळे (वय ३६, रा. देऊळगाव मही) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून मधुकर अशोक शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, सचिन हरीभाऊ शिंगणे, दिनकर रामराव शिंगणे, सिद्धेश्वर म्हस्के, भगवान समाधान शिंगणे, ऋषिकेश जगन्नाथ शिंगणे (सर्व रा. देऊळगाव मही) यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. या दरम्यान अल्पवयीन मुलीवर गैरवर्तनाचा प्रयत्न, महिलांचा विनयभंग, तसेच नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय आरोपींनी फिर्यादीच्या घरातून १ लाख ९१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने जबरदस्तीने नेल्याचा, वाहनाची काच फोडून नुकसान केल्याचा तसेच घरातील कूलर फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे. घर जाळून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे.
या घटनेप्रकरणी दुसऱ्या गटातील मधुकर अशोकराव शिंगणे (वय ३६, रा. देऊळगाव मही) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविंद्र दादाराव मुळे, दादाराव मुळे, शंकर शिंगणे, गणेश शंकर शिंगणे (सर्व रा. देऊळगाव मही) यांच्यासह इतर ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी, त्यांच्या कुटुंबीयांसह महिलांना मारहाण केली. यावेळी काही आरोपींनी महिलांचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top