Mahabreaking

[breaking_news]

Kiran Gite: जागरूक मुलगीच सक्षम समाज घडवते; डॉ. सौ. किरण गिते यांचे विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन

Kiran Gite: तालुका विधी मंचाच्या वतीने आयोजित ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या जनजागृती उपक्रमांतर्गत देऊळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देऊळगाव राजा येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सौ. किरण पंकज गिते यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि वैयक्तिक विकासाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

Kiran Gite

  ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींशी डॉ. किरण गिते यांचा प्रेरणादायी संवाद

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुका विधी मंचाच्या वतीने आयोजित ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या जनजागृती उपक्रमांतर्गत देऊळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देऊळगाव राजा येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सौ. किरण पंकज गिते यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि वैयक्तिक विकासाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

२२ जुलै २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात डॉ. गिते यांनी सध्याच्या काळात मुलींना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यावरील उपाययोजना तसेच स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि जागरूकतेचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. मुलींनी शिक्षणाबरोबरच स्वतःच्या हक्कांबाबत सजग राहून प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संवादात्मक पद्धतीने आयोजित या कार्यक्रमात डॉ. गिते यांनी विद्यार्थिनींना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थिनींच्या शंका दूर करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपस्थित विद्यार्थिनींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर मोकळेपणाने संवाद साधला.

भविष्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांना कशा प्रकारे सामोरे जावे, मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि योग्य निर्णयक्षमता कशी विकसित करावी, याबाबतही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. कोल्हे यांच्या परवानगीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील तिवारी होते. यावेळी बळीराम मापारी, काशिनाथ खांडेभराड, प्रकाश आहिरे, बाबूलाल शिवरकर आणि गोविंद बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण जायभाये यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी डॉ. सौ. किरण गिते यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top