Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Patur police : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पातूर पोलिसात गुन्हा दाखल

Patur police : पातूर तालुक्यातील एका गावातील गोपाल पाटखेडे यांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली. या प्रकरणात त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांच्या भावाने पातुर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.त्यावरून दोन सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Patur police

मृतक गोपाल पाटखेडे यांच्या भावाची तक्रार; दोन सावकारांविरुद्ध गुन्हा

राहुल सोनोने

दिग्रस बू : पातूर तालुक्यातील एका गावातील गोपाल पाटखेडे यांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली. या प्रकरणात त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांच्या भावाने पातुर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.त्यावरून दोन सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतकाचे भाऊ नागेश वामनराव पाटखेडे यांनी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, राकेश भूपेंद्र गांधी (वय ४५, व्यवसाय सावकारी), सचिन उर्फ बंटी अरुण खरळ (व्यवसाय सावकारी), दिलीप आप्पाराव देशमुख (वय ५७, राहणार अकोला) तसेच संतोष बळीराम सावंत (राहणार पातूर) यांनी गोपाल पाटखेडे यांना सतत धमक्या देत मानसिक छळ केला.

फिर्यादीने सांगितले की, २७ नोव्हेंबर रोजी मृतकाचा मोबाईल पाहिला असता त्यामध्ये आत्महत्येपूर्वी केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आढळून आले. या रेकॉर्डिंगमध्ये मृतकाने राकेश गांधी यांच्याकडून २० टक्के व्याजाने घेतलेल्या रकमेसंदर्भात माहिती दिली आहे. पैसे व्याजासह पूर्ण परत केल्यानंतरही आरोपी राकेश गांधी व सचिन उर्फ बंटी खरळ यांनी त्यांना जीव देण्याची धमकी देऊन मौजा बेलोरा खुर्द (ता. पातूर) येथील सर्वे नं. ७२ मधील १ हेक्टर ३७ आर पैकी ४० आर शेतजमीन जबरदस्तीने त्यांच्या नावावर खरेदी नोंद करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सदर खरेदी नोंद (दस्त क्रमांक ५१५९/२०२५) करताना दिलीप देशमुख व संतोष सावंत यांनी सहकार्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. संपूर्ण रक्कम परत केल्यानंतरही आरोपींनी आठ लाख रुपये बाकी असल्याचे सांगत दबाव टाकला. या सततच्या धमक्या, सावकारीचा छळ आणि मानसिक अत्याचारामुळे गोपाल पाटखेडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे.

तक्रारीच्या आधारे पातूर पोलिसांनी राकेश भूपेंद्र गांधी व सचिन उर्फ बंटी अरुण खरळ यांच्याविरुद्ध कलम १०८, ३५२, ३(५)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पातूर पोलिस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top