A blood donation camp : बुलढाणा तालुक्यातील धाड पोलीस स्टेशन अंतर्गत २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिर धाड पोलीस स्टेशनच्या आवारात सकाळी ठीक १० वाजता सुरू होणार आहे.

मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील धाड पोलीस स्टेशन अंतर्गत २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिर धाड पोलीस स्टेशनच्या आवारात सकाळी ठीक १० वाजता सुरू होणार आहे.
या रक्तदान शिबिरात धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय प्रताप भोसले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभाग घेणार आहेत. शिबिराचे उद्घाटन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते होणार असून, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी (बुलढाणा) सुधीर पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय प्रताप भोसले यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून आपली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी जपली आहे. सध्या राज्यभरात रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली असून, ही बाब लक्षात घेऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदानाचा हा महायज्ञ हाती घेण्यात आला आहे. या रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त नागरिकांनी व तरुणांनी सहभागी होऊन सामाजिक दायित्व निभावावे, असे आवाहन धाड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

