Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

black and yellow taxi and a motorcycle : काळीपिवळी व दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

black and yellow taxi and a motorcycle : भरधाव काळीपिवळी व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास चिखली–अमडापूर महामार्गावरील दहिगाव फाट्यासमोर घडला. सतीश सदाशिव सपकाळ (वय ३६, रा. करतवाडी, ता. चिखली) असे मृतकाचे नाव आहे.

A black and yellow taxi and a motorcycle
चिखली–अमडापूर महामार्गावरील दहिगाव फाट्यासमोरील घटना

चिखली : भरधाव काळीपिवळी व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास चिखली–अमडापूर महामार्गावरील दहिगाव फाट्यासमोर घडला. सतीश सदाशिव सपकाळ (वय ३६, रा. करतवाडी, ता. चिखली) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील करतवाडी येथील सतीश सपकाळ हे चिखली येथून आपल्या गावाकडे एम.एच. २८ झेड ६०५४ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने अमडापूरहून प्रवासी घेऊन चिखलीकडे येणाऱ्या काळीपिवळी एम.एच. २८ एच ३३७९ या वाहनाने त्यांच्या दुचाकीस समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सतीष सपकाळ यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. चिखली–अमडापूर मार्गावरील दहिगाव फाटा परिसरात, शेळके यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेले रवि पाखरे, संजय गवई, भास्कर पाखरे, रफिक मेंबर, विनोद वानखडे आदी नागरिक तसेच पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका पाचारण करून सतीष सपकाळ यांना चिखली येथील रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सतीश सपकाळ यांचा अकाली मृत्यू झाल्याने करतवाडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top