Unanimous election: येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले न.प. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE Act, 2009) मधील तरतुदींनुसार शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी किरण डोईफोडे, तर उपाध्यक्षपदी मनीषाताई सरपते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुरज गुप्ता यांची निवड झाली. तसेच समितीच्या सदस्यपदी पत्रकार विलास जगताप, अॅड. भालचंद्र डोईफोडे, अॅड. परमेश्वर शेलके, लताताई बोरकर, साधनाताई पवार, वैशालीताई गवळी, अनुराधाताई पवार, अश्विनीताई गव्हाणे आणि जावेद खान यांची निवड करण्यात आली.

शालेय विकासाला मिळणार नवी दिशा; व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किरण डोईफोडे
देऊळगाव राजा : येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले न.प. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE Act, 2009) मधील तरतुदींनुसार शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी किरण डोईफोडे, तर उपाध्यक्षपदी मनीषाताई सरपते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुरज गुप्ता यांची निवड झाली. तसेच समितीच्या सदस्यपदी पत्रकार विलास जगताप, अॅड. भालचंद्र डोईफोडे, अॅड. परमेश्वर शेलके, लताताई बोरकर, साधनाताई पवार, वैशालीताई गवळी, अनुराधाताई पवार, अश्विनीताई गव्हाणे आणि जावेद खान यांची निवड करण्यात आली.
दि. २० ऑगस्ट रोजी शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य बळीराम मापारी होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजमाने यांनी RTE कायद्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेच्या विकासात पालक आणि समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणारी महत्त्वपूर्ण व्यवस्था असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करणे, उपलब्ध सुविधांचा योग्य वापर, शाळा विकास आराखडा तयार करणे तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, यासाठी समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास करणे तसेच पालक, शिक्षक आणि समाजातील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सभेचे प्रास्ताविक मंगल गाडगे यांनी केले, तर आभार अनिल बुरकुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतीश पिंगळे, प्रदीप गाडे, अनंता सानप, सुधाकर इंगळे, संगीता कुमठे, प्रतिभा लोंढे, जिजा जीठे, उर्मिला वाघ, संगीता देवकर आणि रिता वाघ यांनी परिश्रम घेतले.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ आणि सर्व सदस्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारीवृंद, पालकवर्ग तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले न.प. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

