Mahabreaking

[breaking_news]

  Dhaga Shaurya Ka Rakhi :सीमेवरील जवानांसाठी कुरणखेडच्या बहिणींचा प्रेमाचा धागा; ‘धागा शौर्य का राखी’ अभियान उत्साहात

Dhaga Shaurya Ka Rakhi : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुरणखेड येथे ‘धागा शौर्य का राखी’ अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत सीमेवर तैनात सैनिक बांधवांसाठी गावातील महिला बचत गटांसह विद्यार्थिनींनी राख्या व प्रेमभावनेची पत्रे पाठविली.

Rakhi

   राखीतून जवानांना कृतज्ञतेचा संदेश; कुरणखेडमध्ये ‘धागा शौर्य का राखी’ अभियान

बोरगाव मंजू : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुरणखेड येथे ‘धागा शौर्य का राखी’ अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत सीमेवर तैनात सैनिक बांधवांसाठी गावातील महिला बचत गटांसह विद्यार्थिनींनी राख्या व प्रेमभावनेची पत्रे पाठविली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिकारक वीर भगतसिंग यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमांना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या नूतनताई हरीश पिंपळे होत्या. प्रमुख उपस्थितांमध्ये पोलीस निरीक्षक कैलाश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, ग्रामीण पत्रकार संघ अकोला तालुका अध्यक्ष संजय तायडे, प्रशासकीय सरपंच प्रगती पांडे, सैनिक फिजिकल अकॅडमीचे संचालक मंगेश घुगे, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अनिल शेरेवार, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे, पत्रकार संतोष चक्रनारायण, कुलस्वामिनी चंडिका देवी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण राऊत, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल योगिता बुदे आदींचा समावेश होता.

यावेळी कुलस्वामिनी चंडिका देवी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष नूतनताई हरीश पिंपळे यांना राखी बांधून अभियानाचा संदेश दिला. तसेच कुरणखेड येथील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सैनिक बांधवांसाठी राख्या आणि प्रेमभावनेने लिहिलेली पत्रे पाठविली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश विजयकर यांनी केले. देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांप्रती समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘धागा शौर्य का राखी’ अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन सपना तळोकार यांनी केले, तर आभार पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी मानले.

या अभियानाला वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे विजय माल्टे, शाहबाज शहा, गणेश धानोरकर, मयूर धानोरकर, प्रथमेश भेडकर, कुलस्वामिनी चंडिका देवी इंग्लिश स्कूल, पायल मालाणी, दीपा दहिकार, खुशी सोनवणे तसेच कुरणखेड येथील महिला बचत गटांचे सहकार्य लाभले.

सैनिकांच्या मनगटावर बांधली जाणारी प्रत्येक राखी हा केवळ धागा नसून देशरक्षणासाठी त्याग, शौर्य आणि कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञतेची भावना आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top