Mahabreaking

[breaking_news]

Gram Rojgar Sevaks :ई-पिक पाहणी करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचा आवाज; प्रतिप्लॉट १०० रुपये मानधनाची मागणी

Gram Rojgar Sevaks : ई-पिक पाहणीचे काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिप्लॉट १०० रुपये मानधन देण्यात यावे, तसेच पाहणीदरम्यान जखमी झाल्यास शासनाकडून वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामरोजगार सेवक संघटनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Gram

 शेतशिवारात जीव धोक्यात घालून ई-पिक पाहणी; ग्रामरोजगार सेवकांची मानधनासह सुरक्षेची मागणी

गजानन तिडके

देऊळगाव राजा : ई-पिक पाहणीचे काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिप्लॉट १०० रुपये मानधन देण्यात यावे, तसेच पाहणीदरम्यान जखमी झाल्यास शासनाकडून वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामरोजगार सेवक संघटनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामरोजगार सेवक संघटना, पंचायत समिती देऊळगाव राजा यांच्या वतीने 19 ऑगस्ट  २०२६ रोजी तहसीलदारांना हे निवेदन देण्यात आले. संघटनेचे तालुकास्तरीय पदाधिकारी यांच्या स्वाक्षरीने  देण्यात आले निवेदनात ई-पिक पाहणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

निवेदनानुसार, ग्रामरोजगार सेवकांना प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन मोबाईलच्या माध्यमातून ई-पिक पाहणी करावी लागते. अनेक ठिकाणी शेतांभोवती काटेरी कुंपण, विद्युत प्रवाह असलेले तारांचे कुंपण तसेच इतर अडथळे असल्याने पाहणी करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ई-पिक पाहणीचे काम करणाऱ्या सहाय्यकांना योग्य मोबदला आणि सुरक्षिततेची हमी देणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

प्रतिप्लॉट १०० रुपये मानधनाची मागणी

ई-पिक पाहणीचे काम हे अतिरिक्त जबाबदारीचे असून, त्यासाठी ग्रामरोजगार सेवकांना स्वतंत्र मानधन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक पिक पाहणीसाठी प्रतिप्लॉट १०० रुपये या प्रमाणात मानधन देण्यात यावे, अशी स्पष्ट मागणी संघटनेने केली आहे.

याशिवाय, प्रत्येक पिक पाहणी सहाय्यकाला अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून शेतशिवारात पाहणी करताना संबंधित व्यक्ती शासकीय कामासाठी आल्याचे स्पष्ट होईल, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

जखमी झाल्यास शासनाने खर्च उचलावा

ई-पिक पाहणी करताना शेतातील विद्युत कुंपण, काटेरी तार किंवा अन्य कारणांमुळे कर्मचारी जखमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

ग्रामरोजगार सेवकांना ई-पिक पाहणीचे काम करताना आवश्यक त्या सुविधा व संरक्षण उपलब्ध करून देऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल सखाराम वाघ , उपाध्यक्ष कोतिक उतमराव झिने आणि सचिव सुनील तुकाराम कोल्हे  यांनी हे निवेदन दिले असून, त्याची प्रत संबंधित लोकप्रतिनिधींनाही देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top