Mahabreaking

[breaking_news]

sand mafia :रेती माफियांची मुजोरी; तहसीलदारांच्या खासगी वाहनाला धडक देवून चिरडण्याचा प्रयत्न 

sand mafia : तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणाऱ्या रेती माफीयांची मुजोरी वाढली असून चक्क देऊळगाव राजाचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या खासगी वाहनाला टिप्परने चिरडण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी सकाळी अंढेरा फाटा येथे घडली.  या घटनेमुळे महसूल विभागाच्या पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अंढेरा पोलिसांनी टिप्पर चालकासह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

sand mafia

अंढेरा फाट्यावर खळबळ: रेतीने भरलेला टिप्पर नेला पळवून, एकाविरुध्द गुन्हा दाखल

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणाऱ्या रेती माफीयांची मुजोरी वाढली असून चक्क देऊळगाव राजाचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या खासगी वाहनाला टिप्परने चिरडण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी सकाळी अंढेरा फाटा येथे घडली.  या घटनेमुळे महसूल विभागाच्या पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अंढेरा पोलिसांनी टिप्पर चालकासह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

sand mafia

गत काही दिवसांपासून देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी रेतीची अवैध वाहतुकीवर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या दमदार कामगिरीची दखल घेत त्यांना नुकतेच 15 ऑगस्ट रोजी आदर्श तहसीलदार म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे.  डोंगरजाळ या आपल्या पथकासह अंढेरा फाटा परिसरात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करीत होत्या. सकाळी सुमारे ६.४५ ते ७.०४ वाजेच्या दरम्यान पथकाला पांढऱ्या रंगाचा विनाक्रमांकाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परमधून अंदाजे चार ब्रास रेतीची वाहतूक होत होती. या रेतीची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महसूल पथकाने टिप्परवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी हर्षल मनोहर अंभोरे (रा. एकलारा, ता. चिखली, जि. बुलढाणा) याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर पथकाच्या वाहनाला धडक देऊन तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांना जीवाने मारण्याच्या उद्देशाने वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर फिर्यादींच्या खासगी ब्रिझा वाहनास आडवे वाहन लावून रेतीने भरलेला टिप्पर घटनास्थळावरून पळवून नेण्यास मदत करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेनंतर महसूल विभागात खळबळ उडाली असून, अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी किती वाढली आहे, याचे हे गंभीर उदाहरण मानले जात आहे.

या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १३२, ३०३(२), १२६(२), ४५, ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हर्षल अंभोरे याच्यासह एका अज्ञात व्यक्तीचा आरोपी म्हणून समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच मेहकरचे SDPO संतोष खाडे तसेच अंढेरा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सविता कुवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता कुवारे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई हेड कॉन्स्टेबल विनायक टेकाळे यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top