Mahabreaking

[breaking_news]

commits suicide :स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, नंतर राजीनामा अन् जीवनाचा अंत; समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

commits suicide :कामाचा वाढता ताण आणि वरिष्ठांकडून येणाऱ्या सूचनांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगत एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. डॉ. संदीप प्रकाशराव हाडे (वय ३७, रा. गोहगाव हाडे) असे मृत्यू झालेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचे नाव आहे.

commits suicide

 ‘मानसिक स्वास्थ्य ठीक नाही’ म्हणत राजीनामा; काही तासांतच CHO ने घेतला टोकाचा निर्णय

डोणगाव : कामाचा वाढता ताण आणि वरिष्ठांकडून येणाऱ्या सूचनांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगत एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. डॉ. संदीप प्रकाशराव हाडे (वय ३७, रा. गोहगाव हाडे) असे मृत्यू झालेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांडवा फॉरेस्ट येथील आरोग्य उपकेंद्रावर डॉ. संदीप हाडे मागील चार महिन्यांपासून समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. उपकेंद्राची पाहणी करण्यासाठी केंद्रस्तरीय ‘NQAS’ (National Quality Assurance Standards) पथक येणार होते. या पार्श्वभूमीवर उपकेंद्राची तयारी पूर्ण करण्यासाठी तसेच पाहणीदरम्यान सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचे दाखविण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी सकाळी डॉ. हाडे यांनी मांडवा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले. त्यानंतर सकाळी सुमारे ११ वाजता ते देऊळगाव साखरशा येथे गेले आणि तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आपल्या राजीनाम्यात ‘माझी मानसिक स्वास्थ्याची स्थिती ठीक नसल्यामुळे मी राजीनामा देत आहे,’ असा उल्लेख केल्याचे सांगण्यात येते.

राजीनामा दिल्यानंतर डॉ. हाडे आपल्या मूळ गावी गोहगाव हाडे येथे गेले. तेथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. १५ ऑगस्टच्या सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, डॉ. हाडे यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कौटुंबिक वाद नसल्याने कामाच्या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे. मात्र, आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा अधिकृत निष्कर्ष चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

डॉ. हाडे यांनी राजीनामा देताना मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यावेळी आपण त्यांची समजूत काढली आणि कामाचा कोणताही ताण घेऊ नका, असा सल्ला दिला होता, अशी माहिती देऊळगाव साखरशा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांनी दिली.

या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केली आहे. डॉ. संदीप हाडे यांच्या मृत्यूमागील परिस्थितीची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी संघटनेची भूमिका आहे. यासंदर्भात संघटना लवकरच केंद्रीय आयुष मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती देण्यात आली.

“डॉ. संदीप हाडे राजीनामा घेऊन आले असता त्यांनी मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे सांगितले होते. मी त्यांची समजूत काढली होती आणि कामाचा कोणताही तणाव घेऊ नका, असा सल्लाही दिला होता.”

— डॉ. अनिकेत राठोड, वैद्यकीय अधिकारी, देऊळगाव साखरशा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top