Mahabreaking

[breaking_news]

Thieves:  स्प्रिंकलरच्या तोट्या, स्टँडसह केबलवर चोरट्यांचा डल्ला; डोणगावात गुन्हा दाखल

Thieves: डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोणगाव शिवार भाग १ व २ मधील शेतातून अज्ञात चोरट्याने स्प्रिंकलरच्या तोट्या, स्टँड तसेच विजेच्या केबलसह एकूण १३ हजार ८०० रुपयांचे शेती साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Thieves

  शेती साहित्य चोरट्यांच्या निशाण्यावर; डोणगाव शिवारातून १३,८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस

डोणगाव   : डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोणगाव शिवार भाग १ व २ मधील शेतातून अज्ञात चोरट्याने स्प्रिंकलरच्या तोट्या, स्टँड तसेच विजेच्या केबलसह एकूण १३ हजार ८०० रुपयांचे शेती साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

बाजड गल्ली, वॉर्ड क्रमांक ५, डोणगाव येथील रहिवासी शेतकरी अर्जुन मोतीराव बाजड (वय ६०) यांच्या शेतात ही चोरी झाली. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने शेतात प्रवेश करून शेती साहित्य लंपास केले.

चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये ६ हजार रुपये किमतीच्या स्प्रिंकलरच्या २० तोट्या, ५ हजार रुपये किमतीचे १० स्प्रिंकलर स्टँड, १ हजार ४०० रुपये किमतीची ७० फूट सोलर मोटर केबल आणि १ हजार ४०० रुपये किमतीची ७० फूट ५ एचपी मोटरपंप केबल, असा एकूण १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल आहे.

शेतकरी अर्जुन बाजड यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून डोणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ठाणेदार गणेश इंगोले यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार संजय घिके पुढील तपास करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, शेतातील शेती साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top