Mahabreaking

[breaking_news]

Buldhana district : शिष्यवृत्ती परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याची दमदार कामगिरी; राज्य गुणवत्ता यादीत 45 विद्यार्थी

Buldhana district : शैक्षणिक वर्षातील इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, शिष्यवृत्तीच्या दोन्ही परीक्षांमध्ये जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील एकूण 45 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.

Buldhana district

शिष्यवृत्ती परीक्षेत बुलढाणा विदर्भात अव्वल; 45 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत मिळविले स्थान

बुलढाणा : शैक्षणिक वर्षातील इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, शिष्यवृत्तीच्या दोन्ही परीक्षांमध्ये जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील एकूण 45 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. यामध्ये इ.५व ८ चे १७ विद्यार्थी व इ.४ थी व ७ वी चे २८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून १६ हजार १६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ हजार ७३५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. यातील ६ हजार ४६५ विद्यार्थी पात्र ठरले असून, इयत्ता पाचवीचा निकाल ४१.०९ टक्के लागला. राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीचे ९ विद्यार्थी झळकले.

इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठी ११ हजार ९०७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ११ हजार ५४१ विद्यार्थी उपस्थित राहिले. यातील ३ हजार ८९५ विद्यार्थी पात्र ठरले असून, इयत्ता आठवीचा निकाल ३३.७५ टक्के लागला. राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता आठवीचे ८ विद्यार्थी स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले.

इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १८ हजार ५४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १७ हजार ७२६ विद्यार्थी उपस्थित राहिले असून, ७ हजार ९२८ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता चौथीचा निकाल ४४.७३ टक्के लागला. इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी १३ हजार ६३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२ हजार ८५८ विद्यार्थी उपस्थित राहिले असून, ५ हजार ७८९ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता सातवीचा निकाल ४५.०६ टक्के लागला.

इयत्ता चौथी व सातवीच्या राज्य गुणवत्ता यादीत एकूण 45 विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामध्ये इयत्ता चौथीचे ५ आणि इयत्ता सातवीचे २३ विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा, सवना येथील तब्बल १५ विद्यार्थ्यांनी, तर वळती येथील शाळेच्या ३ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

राज्य गुणवत्ता यादीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पालकमंत्री मकरंद पाटील, केंद्रीय आयुष्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी खरात तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top