Samarth Pharmacy:श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेद्वारा संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे डी. फार्म., बी. फार्म. व एम. फार्म. हे अभ्यासक्रम सुरू आहेत. नुकताच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी. फार्म. चौथ्या सेमिस्टर व एम. फार्म. द्वितीय सेमिस्टरचा निकाल जाहीर केला. या निकालात महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत दमदार कामगिरी केली आहे.

समर्थ फार्मसीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची यशाची भरारी; विद्यापीठ निकालात अव्वल कामगिरी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेद्वारा संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे डी. फार्म., बी. फार्म. व एम. फार्म. हे अभ्यासक्रम सुरू आहेत. नुकताच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी. फार्म. चौथ्या सेमिस्टर व एम. फार्म. द्वितीय सेमिस्टरचा निकाल जाहीर केला. या निकालात महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत दमदार कामगिरी केली आहे.
एम. फार्म. फार्माकोलॉजीमध्ये चैताली विलास उगले हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर आकांक्षा सतीश मोरे हिने द्वितीय व निकिता प्रेमलाल मालेवार हिने तृतीय क्रमांक मिळविला. एम. फार्म. फार्माकॉग्नोसीमध्ये अश्विनी रामदास भुतेकर हिने प्रथम, ऋतुजा दामोदर आमले हिने द्वितीय, तर आकांक्षा पोहपसिंग पटेल हिने तृतीय क्रमांक मिळविला.
एम. फार्म. फार्मास्युटिक्समध्ये पुनम विलास खरात हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रांजली सुरेश चौधरी हिने द्वितीय, तर शितल रंजनराव सोनकांबळे हिने तृतीय क्रमांक मिळविला.
बी. फार्म. चौथ्या सेमिस्टरमध्येही विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. अंकिता अरुण खांदेभराड हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर अंजली प्रशांत सोनुने, आनंद रामेश्वर आंधळे व चंचल कैलास खरात यांनी समान गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे तसेच सहसचिव तथा आमदार मनोज कायंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल ताठे, उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे, विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम लड्डा, विभागप्रमुख प्रा. किशोर चराटे, डॉ. दिनेश घुबे, डॉ. पवन नारखेडे, डॉ. मीनाक्षी चित्ते, डॉ. उबरहंडे, डॉ. गिरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

