ABVPs Deulgaon Raja : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (अभाविप) देऊळगाव राजा नगराची २०२६-२७ ची नगर कार्यकारणी अखंड भारत दिनानिमित्त जाहीर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतमाता पूजन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी अभाविपचे देऊळगाव राजा-सिंदखेडराजा उपजिल्हा संयोजक दिवेशजी पिसे उपस्थित होते.

रितेश कापसे नगरमंत्री, गौरव सुरुशे व शुभम पवार सहनगरमंत्री; अभाविपची नवी टीम सज्ज
देऊळगाव राजा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (अभाविप) देऊळगाव राजा नगराची २०२६-२७ ची नगर कार्यकारणी अखंड भारत दिनानिमित्त जाहीर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतमाता पूजन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी अभाविपचे देऊळगाव राजा-सिंदखेडराजा उपजिल्हा संयोजक दिवेशजी पिसे उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देऊळगाव राजा नगराच्या नवीन कार्यकारणीत विविध जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत.
विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड
या कार्यकारणीत नगराध्यक्ष म्हणून प्राचार्य नितीनजी मेहेत्रे सर, तर नगरमंत्री म्हणून रितेश कापसे यांची निवड करण्यात आली. सहनगरमंत्री म्हणून गौरव सुरुशे व शुभम पवार यांची निवड झाली आहे.
तसेच नगर संपर्कप्रमुख म्हणून योगेश काळुसे, नगर सहसंपर्कप्रमुख म्हणून गौरव वायझाडे, नगर महाविद्यालयीन प्रमुख म्हणून भागवत मुंडे, नगर SFD प्रमुख म्हणून सोहम इंगळे, नगर कार्यालय प्रमुख म्हणून अश्विन तोंडे, नगर SFS प्रमुख म्हणून आकाश नागरे, नगर प्रसिद्धी प्रमुख म्हणून सार्थक माळोदे आणि नगर महाविद्यालय सहसंपर्कप्रमुख म्हणून भूषण असोलकर यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच विविध प्रश्नांसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

