Mahabreaking

[breaking_news]

Condolence visit :शाहिद देशमुख यांच्या कुटुंबीयांची वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून सांत्वनपर भेट

Condolence visit : लोहरा येथील रहिवासी तथा माजी सरपंच हाजी लतीफ देशमुख यांचे नातू आणि युवा शेतकरी शाहिद आसिफ देशमुख यांचा नदीपात्रात चार बैलांसह झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेमुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून लोहरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Condolence visit

दुर्दैवी घटनेने लोहरा गावावर शोककळा; देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात वंचितचे पदाधिकारी सहभागी

बाळापूर : लोहरा येथील रहिवासी तथा माजी सरपंच हाजी लतीफ देशमुख यांचे नातू आणि युवा शेतकरी शाहिद आसिफ देशमुख यांचा नदीपात्रात चार बैलांसह झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेमुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून लोहरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दि. ११ ऑगस्ट रोजी शोकाकुल देशमुख कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य तथा जिल्हा समन्वयक, माजी आमदार नैतिकउद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. यावेळी देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत, या कठीण प्रसंगी वंचित बहुजन आघाडी परिवारासोबत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी सचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, राजू मोरे, दिलीप डोंगरे, शहजाद खान, युसूफ पैलवान, महादेव डोंगरे, योगेश शेळके, संदेश मोरे, तानाजी मोरे, सहदेव भटकर, डॉ. वसीफ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित सर्वांनी दिवंगत शाहिद आसिफ देशमुख यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून देशमुख परिवाराच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top