Mahabreaking

[breaking_news]

directors elected unopposed:जिल्हा बँकेचे १२ संचालक बिनविरोध; शिंगणे सहकार पॅनेलचे वर्चस्व

directors elected unopposed: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. सहकार चळवळीची परंपरा कायम ठेवण्यासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना जवळपास यश आले असतानाच सिंदखेडराजा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नेत्यांनी निवडणुकीत आव्हान उभे केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

directors elected unopposed

राजकीय विरोध की दबाव तंत्र? अजित पवार गटाच्या खेळीने निवडणुकीत रंगत

 अशोक इंगळे

सिंदखेडराजा  : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. सहकार चळवळीची परंपरा कायम ठेवण्यासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना जवळपास यश आले असतानाच सिंदखेडराजा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नेत्यांनी निवडणुकीत आव्हान उभे केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

खामगाव येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत एकमत झाले होते. भाजप, दोन्ही शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नेत्यांनी सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या गटातील संभाव्य उमेदवारांची नावे पुढे केली. त्यातून सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या विचारांच्या सहकार पॅनेलचे तब्बल १२ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

१३ तालुक्यांपैकी १० सहकारी सोसायटी मतदारसंघांमधून १० संचालक बिनविरोध झाले. सिंदखेडराजातून डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे, मेहकरमधून प्रतापराव गणपतराव जाधव, चिखलीमधून अंकुशराव व्यंकटेश पाटील, बुलढाण्यातून मयुर गणेश बाहेकर, खामगावमधून दिनेश राजाराम काळे, शेगावमधून पांडुरंग पुरुषोत्तम पाटील, देऊळगाव राजातून कावेरी समाधान सोनसळे, मोताळ्यातून संजय रामभाऊ गायकवाड, नांदुरातून राजेश रमेशराव देशमुख आणि जळगाव जामोदहून प्रसन्नजित तायडे पाटील यांची निवड झाली आहे. याशिवाय जालिंदर आश्रुबा बुधवत आणि आकाश पांडुरंग फुंडकर यांचीही बिनविरोध निवड झाली.या १२ संचालकांमध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित नेत्यांचा समावेश असल्याने सहकाराच्या राजकारणात सर्वपक्षीय समीकरणाची झलक पाहायला मिळत आहे.

 

 राकॉ अजित पवार गटाची खेळी कितपत यशस्वी होणार?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे आणि जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटल्याने या निवडणुकीला वेगळे राजकीय वळण मिळाले आहे. ही भूमिका राजकीय वर्चस्वाची लढाई आहे की सहकार क्षेत्रातील स्वतंत्र भूमिका, याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांनी बुलढाणा जिल्ह्यात सहकाराची मजबूत पायाभरणी केली. सहकार क्षेत्रात काम करताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवावे, ही भूमिका सहकार क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी वेळोवेळी मांडली आहे. त्यामुळे केवळ राजकीय प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्यासाठी ही निवडणूक लढविली जात असेल, तर त्याचा परिणाम सहकाराच्या राजकारणावर काय होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

सिंदखेडराजातील राजकीय संघर्षाचा सहकारावर परिणाम?

सिंदखेडराजा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव करण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येत आहे का, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, सहकार संस्थांच्या निवडणुकीत थेट पक्षीय राजकारण आणल्यास सहकार चळवळीसमोर नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोसायटी मतदारसंघातील लोणार, संग्रामपूर आणि मलकापूर या तीन तालुक्यांतील तीन जागा, महिला राखीव दोन जागा आणि इतर राखीव चार जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे या जागांवरील लढतीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

१२ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणुकीतील बहुतांश राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असली, तरी उर्वरित जागांवरील लढत ही केवळ औपचारिकता ठरणार की त्यातून सहकाराच्या राजकारणात नवे समीकरण जन्माला येणार, याची उत्सुकता आहे. स्व. भास्करराव शिंगणे यांच्या सहकार विचारांचा प्रभाव आजही जिल्ह्यात कायम असल्याने उर्वरित निवडणुकीकडे राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top