Mahabreaking

[breaking_news]

  Saint Savata Mali :संत सावता माळींच्या पालखीने दुमदुमली साखरखेर्डा नगरी; शेकडो भाविकांची उपस्थिती

Saint Savata Mali :संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त साखरखेर्डा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाचा गजर, संत सावता माळींच्या अभंगांचे गायन आणि विठ्ठलनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात भव्य पालखी सोहळा पार पडला. या सोहळ्यात शेकडो महिला, पुरुष आणि वारकरी संप्रदायातील भाविक सहभागी झाले होते.

 Saint Savata Mali

  अभंगाच्या गजरात भक्तिरसात रंगली साखरखेर्डा नगरी; संत सावता माळींच्या पालखीचे उत्साहात स्वागत

साखरखेर्डा  : संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त साखरखेर्डा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाचा गजर, संत सावता माळींच्या अभंगांचे गायन आणि विठ्ठलनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात भव्य पालखी सोहळा पार पडला. या सोहळ्यात शेकडो महिला, पुरुष आणि वारकरी संप्रदायातील भाविक सहभागी झाले होते.

मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त साखरखेर्डा येथील महात्मा फुले नगरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर संत सावता माळी यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-रुक्मिणी’च्या जयघोषात पालखीने साखरखेर्डा नगरीतील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले.

या पालखी सोहळ्यात महिला आणि वारकरी संप्रदायातील भाविक संत सावता माळी यांचे अभंग गात सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी महिला व पुरुष भाविकांनी पालखीचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. अनेक भजनी मंडळांनीही पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या धार्मिक सोहळ्याचे आयोजन ह.भ.प. राजू खराडे, ह.भ.प. दत्ता शिंदे, प्रणव मंडळकर आणि माजी ग्रामपंचायत सदस्य दगडूबा दानवे यांनी केले होते.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, वसंत नन्हई यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, दुपारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top