Mahabreaking

[breaking_news]

Hearing on the petition :महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर २० ऑगस्टला सुनावणी!

Hearing on the petition : नागपूर १० ऑगस्ट महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या रिट याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Hearing on the petition

बाळापुर : नागपूर १० ऑगस्ट महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या रिट याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश आर. व्यास यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले. हे प्रकरण रिट याचिका क्रमांक ६१०४/२०२६ शी संबंधित असून, मुहम्मद कैसर फारूक पुत्र मुहम्मद अकबर हे याचिकाकर्ते आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य व इतरांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता मोईन इमरान खान मुख्तार खान यांनी बाजू मांडली, तर राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकिलांनी बाजू मांडली.

न्यायालयाच्या १० ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशानुसार, याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या विनंतीवरून या प्रकरणाची सुनावणी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

धार्मिक स्वातंत्र्य, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि संबंधित कायद्याच्या घटनात्मक वैधतेशी निगडित असल्याने हे प्रकरण संवेदनशील मानले जात आहे. मात्र, १० ऑगस्टच्या सुनावणीत याचिकेच्या अंतिम गुणवत्तेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top