Mahabreaking

[breaking_news]

public awareness: नशामुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0’ अंतर्गत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीत विविध जनजागृती उपक्रम

public awareness: श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) विभागाच्या वतीने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0’ या अभियानांतर्गत विविध समाजोपयोगी व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.

public awareness

  स्वच्छता, पथनाट्य आणि योगाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश; समर्थ महाविद्यालयाचा उपक्रम

गजानन तिडके

देऊळगाव राजा : श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) विभागाच्या वतीने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0’ या अभियानांतर्गत विविध समाजोपयोगी व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे तसेच सहसचिव तथा आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.

यानंतर विद्यार्थ्यांनी देऊळगाव राजा शहरातील विविध ठिकाणी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग सत्राचेही आयोजन करण्यात आले.

या अभियानांतर्गत “व्यसनमुक्त तरुण, समृद्ध राष्ट्र” या विषयावर प्रा. किशोर चराटे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम, तरुणांची समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रफुल ताठे यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या सूचनेनुसार तसेच उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम लड्डा, विभागप्रमुख प्रा. किशोर चराटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. निवृत्ती पंडित, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. वैभव चव्हाण, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. शीतल रघुवंशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली असून, व्यसनमुक्त आणि सशक्त समाज घडविण्याचा संदेश प्रभावीपणे जनमानसात पोहोचविण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top