Mahabreaking

[breaking_news]

Mahabreaking Impact :महाब्रेकींग इम्पॅक्ट ;विनापरवानगी वृक्षतोडीवर वन विभागाचा दणका; ३० टन लाकूड जप्त, टेम्पोसह गुन्हा दाखल

Mahabreaking Impact : पांगरी ते खल्याळ गव्हाण मार्गालगत महावितरणच्या विद्युत खांब उभारणीच्या कामादरम्यान विनापरवानगी करण्यात आलेल्या वृक्षतोडीप्रकरणी वन विभागाने धडक कारवाई करत सुमारे ३० टन लाकूड जप्त केले आहे. तसेच लाकूड वाहतूक करणारा एमएच-२८ एबी-७६११ क्रमांकाचा टेम्पो ताब्यात घेऊन वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Theft of iron rods

 पांगरी-खल्याळ गव्हाण मार्गावरील अवैध वृक्षतोड उघड; कंत्राटदारावर कारवाई, लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

गजानन तिडके

देऊळगाव राजा : पांगरी ते खल्याळ गव्हाण मार्गालगत महावितरणच्या विद्युत खांब उभारणीच्या कामादरम्यान विनापरवानगी करण्यात आलेल्या वृक्षतोडीप्रकरणी वन विभागाने धडक कारवाई करत सुमारे ३० टन लाकूड जप्त केले आहे.याविषयी महाब्रेकींग न्यूज पोर्टलला झाडांची अवैध कत्तल करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत वन विभागाने धडक कारवाई केली. तसेच लाकूड वाहतूक करणारा एमएच-२८ एबी-७६११ क्रमांकाचा टेम्पो ताब्यात घेऊन वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पांगरी ते खल्याळ गव्हाण रस्त्यालगत महावितरण विभागामार्फत विद्युत खांब उभारणीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान संबंधित कंत्राटदार आणि काही व्यापाऱ्यांनी आवश्यक शासकीय परवानगी न घेता रस्त्यालगतची विविध प्रजातींची झाडे तोडल्याचे निदर्शनास आले.

तोडण्यात आलेल्या वृक्षांमध्ये करंज, गुलमोहर, जांभूळ, नीम (कडुनिंब), शिसू आदी विविध प्रजातींचा समावेश आहे. नियमानुसार अशा प्रकारची वृक्षतोड करण्यापूर्वी संबंधित कंत्राटदाराने महावितरण विभागामार्फत वन विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. मात्र कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आल्याने संबंधितांवर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम, १९६४ तसेच नियम, १९६७ अंतर्गत दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असता, लाकूड वाहतूक करणारा एमएच-२८ एबी-७६११ क्रमांकाचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला. संबंधित वाहनाविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत वन गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा वनपरिक्षेत्रातील वनपाल करीत आहेत.

कारवाईदरम्यान सुमारे ३० टन लाकूड जप्त करण्यात आले असून, अवैध वृक्षतोडीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही वन विभागाकडून तपास सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये वनपरिक्षेत्र कार्यालय, देऊळगाव राजा येथील वनपाल मेरत तसेच वनरक्षक बुधवत आणि टेकाळे यांनी सहभाग घेतला. वन विभागाने विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत पर्यावरण संरक्षणासाठी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top