Mahabreaking

[breaking_news]

Notorious accused :वर्षानुवर्षे पोलिसांना चकवा देणारा कुख्यात आरोपी जेरबंद; एलसीबीची विश्वी येथे धडक कारवाई

Notorious accused : वाशिम जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला आणि अनेक वर्षांपासून पोलिसांना तसेच न्यायालयीन प्रक्रियेला चकवा देणारा फरार आरोपी बाळू विठ्ठल चव्हाण (वय ४०, रा. वरूड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वी गावात ही कारवाई करण्यात आली.

Notorious accused

 डोणगाव हद्दीत एलसीबीचा सापळा यशस्वी; फरार अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या ताब्यात

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला आणि अनेक वर्षांपासून पोलिसांना तसेच न्यायालयीन प्रक्रियेला चकवा देणारा फरार आरोपी बाळू विठ्ठल चव्हाण (वय ४०, रा. वरूड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वी गावात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू चव्हाण याच्याविरुद्ध रिसोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध वाशिम न्यायालयातही काही प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक वर्षांपासून तो पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेला चकवा देत फरार होता.

फरार आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत बाळू चव्हाण हा डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वी गावात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन सापळा रचला.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला रिसोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार विनोद अवगळे, पोलीस अंमलदार अविनाश वाढे, दीपक घुगे, विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे तसेच चालक पोलीस अंमलदार संदीप डाखोरे यांचा सहभाग होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top