Mahabreaking

[breaking_news]

robbery solved : समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा ४८ तासांत उलगडा; चिखलीतील पाच जणांची टोळी जेरबंद

robbery solved : समृद्धी महामार्गावर प्रवाशाला तलवार आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) वाशिम आणि कारंजा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीतील रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, दोन बनावट पिस्तुले, लोखंडी रॉड आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

robbery solved

तलवारीचा धाक दाखवून लुटणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; बनावट पिस्तुलांसह मुद्देमाल जप्त

कारंजा लाड : समृद्धी महामार्गावर प्रवाशाला तलवार आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) वाशिम आणि कारंजा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीतील रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, दोन बनावट पिस्तुले, लोखंडी रॉड आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी बिहार राज्यातील पटणा जिल्ह्यातील बेलदार टोला येथील रहिवासी तथा बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन (वय ३८) यांनी कारंजा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ते रायपूरकडे कारने प्रवास करत असताना २७ जुलै रोजी पहाटे सुमारे ३ वाजता कारंजा लाड परिसरातील समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी थांबले होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील ५ हजार रुपये रोख, सुमारे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले तसेच इतर साहित्य असा एकूण सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता.

घटनेनंतर कारंजा शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांचे संयुक्त पथक तयार करून तपासाचे आदेश दिले.

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हर्षद पांडुरंग साबळे (रा. चिखली, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्यातील साथीदारांची माहिती दिल्यानंतर चेतन संजय माने, ओम सुरेश सपकाळ, धनंजय उजालसिंग कमळीकर आणि गोपाल श्रीकिसन मोरे (सर्व रा. चिखली तालुका, जि. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीतील ४,७५० रुपये रोख, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार (एमएच-१४ डीएन-१२१३), दोन बनावट पिस्तुले, लोखंडी रॉड आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर आणि मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे तसेच कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top