Mahabreaking

[breaking_news]

BJP launches scathing attack on Congress :पेपरफुटीवरून काँग्रेसवर भाजपचा हल्लाबोल; सुबोध गवई यांचा गंभीर आरोप

BJP launches scathing attack on Congress : देशभरात पेपरफुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनांवर भाजपचे अकोला जिल्हा सरचिटणीस सुबोध गवई यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने विद्यार्थी हिताच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी तथ्यांवर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

BJP launches
NEET पेपरफुटीवरून भाजपची काँग्रेसवर जोरदार टीका; आंदोलनाऐवजी स्पष्टीकरणाची मागणी

अकोला : देशभरात पेपरफुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनांवर भाजपचे अकोला जिल्हा सरचिटणीस सुबोध गवई यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने विद्यार्थी हिताच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी तथ्यांवर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गवई म्हणाले की, केंद्रातील पेपरफुटीच्या घटनांवर काँग्रेस सातत्याने सरकारवर टीका करत आहे. मात्र, महाराष्ट्रातील कथित NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून चर्चेत असलेल्या कोचिंग क्लास संचालक मोटेगावकर यांचा काँग्रेसशी संबंध असल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने आंदोलन करण्याऐवजी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे त्यांनी म्हटले.
गवई यांनी आरोप केला की, राज्यात काँग्रेसशी संबंधित अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस चालवत असून, विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याऐवजी या विषयावर राजकीय भूमिका घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर पक्षीय राजकारण टाळून पारदर्शक भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती किंवा आहे, त्या ठिकाणीही पेपरफुटीच्या घटना घडल्याचा दावा करत, अशा प्रकरणांमध्ये जबाबदारी स्वीकारण्याऐवजी अधिकाऱ्यांवर दोष टाकण्याची भूमिका काँग्रेस घेत असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या कार्यकाळात घडलेल्या पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत गवई म्हणाले की, त्या घटनांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय हेतूने सध्याच्या सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेसकडे विकासाचा ठोस कार्यक्रम नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधी राजकारण हाच पक्षाचा प्रमुख अजेंडा राहिल्याचा आरोपही त्यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top