Mahabreaking

[breaking_news]

Female student stalked : विद्यार्थिनीचा पाठलाग, छेडछाड आणि आईला मारहाण; आरोपीवर पोक्सोअंतर्गत कारवाई

Female student stalked : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न तसेच विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Female student stalked

 ट्युशनवरून परतणाऱ्या विद्यार्थिनीचा रस्ता अडवून विनयभंगाचा आरोप; पालकांनाही धमकी

 बाळापूर : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न तसेच विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अप. क्र. ५३७/२०२६ नोंद करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(१), ७८, १२६(२), २९६, ११५(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ही १५ वर्षे २ महिने वयाची दहावीत शिकणारी विद्यार्थिनी आहे.

फिर्यादीनुसार, २१ जुलै २०२६ पासून आरोपी शाळा व ट्युशनला ये-जा करताना विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग करून तिच्या इच्छेविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करीत होता. २८ जुलै रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता, संजीवनी हॉस्पिटलसमोर विद्यार्थिनी ट्युशनवरून घरी परतत असताना आरोपीने मोटारसायकल आडवी लावून तिचा रस्ता अडविल्याचा आरोप आहे. त्यानंतर “तू मला आवडतेस” असे म्हणत तिचा हात धरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थिनीने आरडाओरडा करताच आरोपी तेथून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घरी परतल्यानंतर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पालक आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच विद्यार्थिनीच्या आईचे केस ओढून मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी २८ जुलै रोजी रात्री ८.५७ वाजता गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top