Mahabreaking

[breaking_news]

School supplies distributed :उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहुणाराजात शालेय साहित्य, गुणवंतांचा गौरव

School supplies distributed : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संत चोखामेळा यांच्या जन्मभूमी असलेल्या मेहुणाराजा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

School supplies distributed

  ‘८० टक्के समाजकारण’चा संदेश;  विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम

गजानन तिडके

देऊळगाव राजा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संत चोखामेळा यांच्या जन्मभूमी असलेल्या मेहुणाराजा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देऊळगाव राजा तालुकाप्रमुख दादाराव खार्डे यांनी केले होते. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी मेहुणाराजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु. आरती रणजीत मोरे हिची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. तसेच कु. राजश्री सुनील डोंगरे व निखिल सुनील डोंगरे यांची आयआयएसईआर (IISER) या नामांकित संस्थेत प्रवेश निश्चित झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारधारेनुसार शिवसेना नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आली आहे. त्याच भावनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास माजी सैनिक भगवान चाटे, माजी उपसरपंच गणेश खराडे, गजानन खराडे, योगेश सोनवणे, शिवाजीराजे जाधव, दीपक बरडे, लखन काकडे, शिवाजी चाटे, राजू डोंगरे, उषाताई डोंगरे, निर्मला काकडे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक सुनील डोंगरे व रणजीत मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन घुगे यांनी केले. गवते सर यांनी सूत्रसंचालन केले. शाळेचे मुख्याध्यापक मुळे सर यांनी शाळेची प्रगती, विविध उपक्रम व शाळेसमोरील अडचणी यांची माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप डोईफोडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top