Mahabreaking

[breaking_news]

Daylight burglary :देऊळगाव राजात दिवसाढवळ्या घरफोडी; ₹2.36 लाखांचा ऐवज लंपास

Daylight burglary : शहरातील शिवाजीनगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Daylight burglary
शाळेत ड्युटीला गेलेल्या महिलेच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : शहरातील शिवाजीनगर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश विष्णू झोरे (वय ३२, रा. अमृत नगर, देऊळगाव राजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान शिवाजीनगर येथील खोरेश्वर मंदिर परिसर, बायपास रोडवरील त्यांच्या निवासस्थानी घडली.
फिर्यादी यांच्या बहिणी शाळेत ड्युटीवर गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या आतील लॉकरमधील ₹१ लाख ४० हजारांची रोकड, प्रत्येकी सुमारे ५ ग्रॅम वजनाचे दोन जोड सोन्याचे झुंबर, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल, तसेच लहान मुलांचे चांदीचे दागिने असा एकूण ₹२ लाख ३६ हजारांचा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी कायमी गुन्हा क्र. ३५०/२०२६ अन्वये कलम ३०५(अ), ३३१(३) व ३(५), भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची नोंद मसाफौ निलीमा जाधव यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कुवारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, शहरात दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना घर बंद ठेवताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top